|
|

उपयुक्त मासिक.. शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१०
शासन आणि शासनाचे उपक्रम याविषयी जनतेच्या मनात सकारात्मक प्रतिमा निर्मिती करण्याचे काम गेली सहा दशके लोकराज्य मासिक नियमितपणे करीत आहे. आता मागील काही वर्षांत लोकराज्यचा बदललेला न्यू लूक तर लोकांना अधिकच आवडला आणि त्यांचा प्रतिसादही वाढला आहे. वाचक त्याबाबतच्या प्रतिक्रियाही आवर्जून पाठवितात.
परभणी येथील वसुली निरीक्षक आर.टी.जिभकाटे यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे, शालांत परीक्षा आटोपल्यानंतर जेव्हा मी स्पर्धा परीक्षा द्यायला सुरूवात केली, त्यावेळी विविध प्रकाशनांची मासिके चाळत असताना एके दिवशी माझ्या हाती लोकराज्य आले. पुढे मी लोकराज्यचा नियमित वाचक बनलो. या मासिकाच्या नियमित वाचनातून मला स्पर्धा परीक्षेसाठी खूपच उपयुक्त असा मजकूर मिळत असतो. मी आज नोकरीवर आहे तरीही लोकराज्य वाचनाचा व्यासंग मात्र कायम आहे. लोकराज्य हे शासनाचा आरसा आहे व राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे घरबसल्या दर्शन घडविणारे एकमेव मासिक आहे.
अशीच एक प्रतिक्रिया एका वाक्यात हिंगोलीच्या बालाजी पोटे यांनी एसएमएसद्वारे व्यक्त केली आहे. ते म्हणतात, Lokrajya is the king of Information.
वाचकांच्या प्रतिक्रियांबद्दल लोकराज्यच्या वतीने धन्यवाद.. लोकराज्यचा प्रत्येक अंक अवश्य वाचा...
केवळ ५० रुपयांत लोकराज्यचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी पुढील पत्त्यावर संपर्क साधा - मनीषा पिंगळे, सहायक संचालक (माहिती), वितरण विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन, बरॅक नं. १९, फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई- ४०० ०२१ दूरध्वनी क्र. (०२२) २२०२१५३०, २२०२३९५७, मोबाईल क्र. ९४ २३२ २८८६२ |
|